शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी गुड फ्रायडे साजरा केला जाणार आहे. याचं नाव गुड फ्रायडे असलं तरीही या दिवशी ख्रिस्ती बांधव हा दिवस शोक दिवस म्हणून साजरा करतात.
जेरुसलेम प्रांतात भगवान येशू ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होते आणि त्यांच्या बोलण्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते. हे तेथील तत्कालीन धर्म प्रसारकांना मान्य नव्हतं.
तत्कालीन धर्म प्रसारकांनी येशू ख्रिस्ताची तक्रार रोम शासक पिलातुस यांच्याकडे करताना म्हटले की येशू ख्रिस्त स्वतःला देवाचा अवतार म्हणतात.
यावरून चिडलेल्या राजाने प्रभू येशू ख्रिस्ताला गोलागोथा नावाच्या वधस्तंभावर (क्रॉसवर) चढवले होते. येशू ख्रिस्तांच्या हाताला आणि पायाला खिळे ठोकले गेले होते आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर (क्रॉसवर) चढवलं गेलं तो दिवस शुक्रवारचा होता. प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो.
याच्या नावात गुड असले तरी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी हा दिवस शोक दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून चर्चमध्ये प्रार्थना केली जाते.
येशू ख्रिस्तांना मोठ्या हाल अपेष्टा सहन करत आपल्या शरीराचा त्याग करावा लागला होता म्हणूनच गुड फ्रायडेच्या दिवशी शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश पाठवले जात नाहीत.
बायबल नुसार तीन दिवसानंतर येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाले होते. म्हणूनच संपूर्ण जगभरात गुड फ्रायडे नंतर येणारा रविवार ईस्टर संडे म्हणून साजरा करण्यात येतो.