दरवर्षी 08 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या समान हक्कासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

स्त्री - पुरुष यांच्यातील भेदभाव दूर करणे, महिला सशक्तिकरण आणि महिलांना सन्मान देणे या उद्देशाने जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

पूर्वीच्या काळी महिलांना शिक्षण, नोकरी आणि मतदान करण्याचा अधिकार नव्हता. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांचा सन्मान होत नसे.

Image Source: Google

8 मार्च 1908 साली अमेरिकेत सर्वप्रथम महिलांनी आपल्या हक्काच्या मागणींसाठी आंदोलन केले होते.

28 फेब्रुवारी 1909 मध्ये युनायटेड स्टेट मध्ये पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता.1975 हे वर्ष युनो ने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले.

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला होता.

1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले.

कला, विज्ञान, संस्कृती, राजकारण आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान या दिवशी केला जातो.