हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च 2024 ला साजरी केली जाणार आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात शिवभक्तांची प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात महाशिवरात्री जोरात साजरी केली जाते.

महाशिवरात्रि का साजरी केली जाते व महाशिवरात्रीशी संबंधित अनेक  पौराणिक कथा आहेत.

समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर निघालेले विषारी हलाहल महादेवांनी प्राशन करून संपूर्ण सृष्टीला वाचवले होते. त्यानंतर झालेल्या संपूर्ण घटनेचा उत्सव म्हणून शिवरात्री साजरी केली जाते.

असे देखील म्हणतात की भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला झाला होता.

एका कथेनुसार भगवान शंकर स्वतः लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले तेव्हा ती फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी होती.

याच दिवशी एका पारध्याचे मन परिवर्तन होऊन त्याने शिकार करणे सोडले होते, आणि त्याच्याकडून नकळत महादेवाची पूजा आणि व्रत झाले होते.