प्रतिभा पाटील यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 रोजी जळगाव जिल्ह्यात झाला. जळगाव येथून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लॉ कॉलेज मधून शिक्षण घेऊन त्या वकील झाल्या.
Image Source: Google
प्रतिभा पाटील यांचा 1965 मध्ये डॉ.देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्या एक उत्तम टेबल टेनिस खेळाडू होत्या.
Image Source: Google
समाजकार्याने सुरुवात केलेल्या उच्चविद्या विभूषित आणि उत्तम संवाद कौशल्य असणाऱ्या प्रतिभा पाटील यांना जळगाव मतदारसंघातून 1962 साली विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तिकीट दिले.
Image Source: Google
1962 पासून महाराष्ट्राच्या आमदार राहिलेल्या प्रतिभा पाटील यांनी 1967 ते 1972 दरम्यान आरोग्य, पर्यटन, गृहनिर्माण, संसदीय कामकाज या खात्यांचा राज्यमंत्री म्हणून कारभार पाहिला.
Image Source: Google
1972 ते 2004 समाज कल्याण मंत्री, शिक्षण, सांस्कृतिक, पुनर्वसन मंत्री, विरोधी पक्षनेत्या, शहर विकास आणि गृहनिर्माण मंत्री, राज्यसभेवर निवड, खासदार, इत्यादी खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला.
Image Source: Google
2004 ते 2007 दरम्यान त्या राजस्थानच्या प्रथम महिला राज्यपाल होत्या. 2007 ते 2012 मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्या पहिल्या भारतीय महिला राष्ट्रपती होत्या.
Image Source: Google
त्यांनी महिला बँकांची स्थापना, आदिवासी विकास योजना, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, ज्योतिबा फुले महामंडळ इत्यादी महामंडळाची स्थापना केली होती.
Image Source: Google
प्रतिभा पाटील यांनी एकूण 15 पुस्तके लिहिली होती तसेच त्यांच्या जीवनचरित्रावर अनेक पुस्तके देखील लिहिली गेलेली आहेत.
Image Source: Google