भगवान विष्णुंचे सातवे अवतार असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे जीवन व चरित्र हे संपूर्ण मानव जातीसाठी आदर्श राहिले आहे.
प्रभू श्रीरामांच्या महिमेची स्तुती करणारे श्री रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. याचे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे व संकटे दूर होतात.
चमत्कारिक रामरक्षा स्तोत्र बुद्ध कौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे. असं म्हणतात की भगवान शंकरानी त्यांना हे चमत्कारिक व कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रूपात सांगितले होते.
अनुष्ठुप श्लोकांमध्ये असलेले हे स्तोत्र लवकरच स्मरणात राहते. या स्तोत्राचे किलक श्री हनुमानजी आहेत. दररोज श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने अनेक फायदे मिळतात.
संपूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने या स्तोत्राचे नियमित पठण केल्यास व्यक्ती सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक संकटे, भीती, दीर्घकालीन आजार, यांपासून सुरक्षित राहू शकतो.
श्री रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठण केल्यास प्रभू श्रीराम अनेक संकटांपासून रक्षा करतात आणि श्री हनुमान प्रसन्न होऊन संकटात असलेल्या रामभक्तांचे नक्कीच रक्षण करतात.
श्री रामरक्षा स्तोत्राचा पाठ केल्याने व्यक्ती भयमुक्त होतो, सुख व समृद्धी प्राप्त करतो. नियमित पाठ केल्याने महादेवाची देखील कृपा प्राप्त होते.
श्री रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याच्या अनेक सोप्या पद्धती आहे. सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसऱ्या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी देखील होऊ शकतो.