दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कुबरेश्वर धाम, सीहोर येथे रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 7 मार्च ते 13 मार्च 2024 ह्या कालावधीत भव्य रुद्राक्ष महोत्सव आणि शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अभिषेक पूजेचा कालावधी हा सकाळी 7 ते 9 आणि दुपारी 1 ते 4 असा असेल.
आयोजन समितीच्या म्हणण्यानुसार 5 लाखांपेक्षा जास्त भाविक येथे उपस्थित राहू शकतात. कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने हलक्या व जड वाहनांचे मार्ग बदलले आहेत.
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शिवमहापुराण कथा वाचक पं. प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेमुळे भारतातील विविध भागातील लोकांना महादेवाच्या भक्तीचे वेड लागले आहे.
Image Source: Google
सारी समस्या का हल एक लोटा जल
श्री शिवाय नमस्तुभ्यम् चा मुखात जप आणि हातात तांब्याभर पाणी घेऊन येणाऱ्या महादेवांच्या भक्तांमुळे गल्लीबोळातील शिवालयांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे.
Image Source: Google
सारी समस्या का हल एक लोटा जल
महाशिवरात्री निमित्त उज्जैन येथील पवित्र महाकाल मंदिर आणि सीहोर येथील कुबेरेश्वर धाम, दोन्ही ठिकाणी महादेवाच्या भक्तांची गर्दी होणार हे नक्की आहे.
Image Source: Google