शनि देवाला न्यायदेवता व कर्मदेवता म्हणून ओळखले जाते. शनीच्या बदलांचा 12 राशींवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव होत असतो.

18 मार्चपासून शनींचे बळ वाढून 5 राशींना त्याचे अभूतपूर्वक फळ मिळण्याचे संकेत आहे. कारण शनीचा कुंभ राशीतच उदय होत आहे.

शनीच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान मिळेल, आजारापासून सुटका मिळू शकते, लक्ष्मीची कृपा होऊ शकते. आई वडिलांची साथ मिळू शकते.

मेष रास (Aries)

शनीच्या उदयामुळे या राशीतील लोकांना धन लाभाचा योग तयार होत आहे, अडकलेले पैसे मिळू शकतील, पती-पत्नीला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

सिंह रास (Leo)

शनीच्या उदयामुळे या राशीतील लोकांना समृद्धी मिळेल, नोकरदारांसाठी हा कालावधी लाभदायक असून नोकरी बदलाचे संकेत आहेत. जमिनीचे प्रश्न मार्गी लागू शकतात.

मिथुन रास (Gemini)

कामात येणारे अडथळे दूर होतील, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल, पगारवाढीचा योग येऊ शकतो.

कन्या रास (Virgo)

शनिदेव हे कुंभ राशीचे स्वामी असून या राशीतच उदय होत असल्याने प्रभाव शक्तीशाली असणार आहे. लग्नाचे योग जुळून येतील, धनसंपत्तीत वाढ होईल आणि मान सन्मान वाढेल.

कुंभ रास (Aquarius)

टीप: सर्व माहिती ही ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे. आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.