भारती एंटरप्राईजेस चे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना युकेचा सर्वोच्च पुरस्कार 'नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (KBE) हा मानद नाईटहूड प्रदान करण्यात आला.

Image Source: Google

सुनील भारती मित्तल हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत. भारत-युके यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे.

Image Source: Google

2007 मध्ये सुनील भारती मित्तल यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मभूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.

Image Source: Google

23 ऑक्टोबर 1957 रोजी लुधियाना, पंजाब येथे त्यांचा जन्म झाला होता. मित्तल हे एक भारतीय अब्जाधीश, व्यापारी आणि परोपकारी आहेत. 2024 मध्ये त्यांची 800 कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती आहे.

Image Source: Google

भारती एंटरप्राईजेस जे दूरसंचार, स्पेस कम्युनिकेशन्स, डिजिटल सोल्युशन्स, रियल इस्टेट आणि हॉस्पिटलिटी मध्ये स्वारस्य असलेल्या भारतातील पहिल्या पिढीतील कॉर्पोरेशन पैकी एक आहेत.

Image Source: Google

सुनील मित्तल हे भारती एंटरप्राईजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. मित्तल हे भारतातील दुसरी आणि विश्वातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Airtel चे मालक आहेत.

Image Source: Google

सुनील मित्तल हे भारती फाउंडेशनच्या माध्यमातून भारताला शिक्षित करण्यासाठी काम करत आहेत.

Image Source: Google

फाउंडेशनने संपूर्ण भारतातील गावांमध्ये शाळा स्थापन केल्या आहेत आणि गरीब मुलांना मोफत पुस्तके गणवेश आणि माध्यन्ह भोजनासह मोफत दर्जेदार शिक्षण दिले आहे.

Image Source: Google

भारती फाउंडेशन चा प्रमुख कार्यक्रम म्हणजे 45 हजारहून अधिक ग्रामीण मुलांना मोफत सेवा देणाऱ्या 6 राज्यांमध्ये 254 शाळा चालवत आहे.

Image Source: Google