14 जून 2020 रोजी बॉलीवूड इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता.
Image Source: Instagram
अवघ्या 34 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती.सुशांतची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असे चाहत्यांचे म्हणणं आहे.
Image Source: Instagram
सुशांतच्या वडिलांनी ही हत्या आहे असे म्हटले होते, परंतु मुंबई पोलिसांनी आपल्या तपासात ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.
Image Source: Instagram
सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण देखील तापले होते. चाहत्यांनी सोशल मीडियावर मोहीम देखील सुरू केली होती. काही ठिकाणी सुशांतला न्याय मिळण्यासाठी मोर्चे देखील निघाले.
Image Source: Instagram
जुलै 2020 मध्ये सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि इतर जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. फसवणूक, पैशांची उधळपट्टी आणि सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
Image Source: Instagram
जुलै 2020 मध्ये या प्रकरणाची चौकशी CBI मार्फत व्हावी अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करण्यात आली होती आणी ऑगस्ट 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्यता देखील दिली.
Image Source: Instagram
सुशांतची मॅनेजर दिशा सालीन यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारने डिसेंबर 2023 मध्ये SIT स्थापन करून तपासाचे आदेश दिले आहेत.
Image Source: Instagram
परंतु आज देखील कुठल्याच यंत्रणाचा स्पष्ट असा अहवाल न आल्याने सुशांत चाहते प्रचंड संतापलेले असून ते सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
Image Source: Instagram