असहाय्य, तेजहीन आणि दुर्बल झालेल्या मानव जातीमध्ये नवचेतना निर्माण करणारे संपूर्ण विश्वाचे स्वामी, श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जाणार आहे.

Image Source: Google

दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते.14 व्या शतकात प्रकट झालेले दुसरे सत्पुरुष नृसिंह सरस्वती आणि 18 व्या शतकात प्रकट झालेले दत्ताचे तिसरे अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ.

Image Source: Dindoripranitorg

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाविषयी सामान्यतः दोन प्रचलित कथा समोर येतात. अनंत कोटी ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकट झाले होते.

Image Source: Google

स्वामी समर्थांचे अत्यंत प्रिय, ज्यांना स्वामी आपले पुत्र मानत होते असे स्वामीसुत(हरिभाऊ) यांच्या म्हणण्यानुसार हस्तीनापुर येथील छेलीखेड गावात स्वामी प्रथम बालरूपात प्रकट झाले होते.

Image Source: Google

प्रकट दिन कथा 1

या गावात विजयसिंग नावाचा लहान मुलगा गणपतीच्या मूर्तिसोबत गोटया खेळत असे. तेथे अचानक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली आणि विजयसिंग सोबत गोटया खेळू लागली.

Image Source: Google

प्रकट दिन कथा 1

शेकडो वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील कर्दळी वनात एका लाकूड तोड्याला लाकडे तोडत असताना श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे दिसून आले होते.

Image Source: Google

प्रकट दिन कथा 2

1856 मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रवेश केला व तेथे जवळपास 21 वर्षे वास्तव्य केले. स्वामींनी तेथे अनेक लोकांचा उद्धार केला मार्गदर्शन केले.

Image Source: Google

स्वामीसुत(हरिभाऊ) जेव्हा अक्कलकोट मध्ये राहत होते तेव्हा त्यांनी प्रथम स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा केला. स्वामीसुत दुसरे कोणी नसून पूर्वजन्मीचे गोटया खेळणारे विजयसिंग होते.

Image Source: Google

स्वामी समर्थांचे अवतार कार्य अतिशय महान होते, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी तारक मंत्र दिला. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींनी दिलेले आश्वासन होय!

Image Source: Google