संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी दत्तात्रेय प्रभूंनी बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला होता. 18 व्या शतकात प्रकट झालेले दत्ताचे तिसरे अवतार म्हणजे स्वामी.
छेली खेडे मध्ये प्रकट होऊन स्वामींनी पूर्ण विश्वामध्ये भ्रमण केले. त्यानंतर पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ नामाभिमान आणि त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती अवतार धारण करत अनेक तीर्थक्षेत्रे तयार केली.
1856 मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला पुन्हा श्री स्वामी समर्थ हा मूळ अवतार धारण करत अक्कलकोट मध्ये प्रवेश केला. लोकांच्या उद्धारासाठी स्वामींनी 22 वर्षांहून अधिक काळ अक्कलकोट येथे वास्तव्य केले.
Image Source: X(Twitter)
स्वामींनी आपल्या अवतारकाळात अनेक लीला दाखविल्यात. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार याविषयीचे मूळ विचार मांडले.
Image Source: X(Twitter)
स्वामींनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनविले. पूर्व संचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. कोणालाही वाऱ्या किंवा खेट्या घालण्यास लावले नाही.
स्वामींनी मानवरुपी देह त्याग जरी केला असेल तरी आज देखील असंख्य भक्तांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे राहत असतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामींनी दिलेल्या मंत्राने संकटकाळी धीर येतो.
6 मे 2024 रोजी स्वामींची 146 वी पुण्यतिथी आहे. सर्व मठात व स्वामी समर्थ केंद्रात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. असंख्य सेवेकरी यानिमित्ताने स्वामींच्या सेवेत लीन होण्यात समाधान मानतात.
संपूर्ण विश्वाच्या स्वामींनी 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधीमठ स्थानी माध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. त्यानंतर स्वामींना चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले.
स्वामींचे अवतार कार्य फार महान होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मानव जातीने आचरण करायला हवे आणि दिलेल्या शिकवणीप्रमाणे परमेश्वराची भक्ती करायला हवी. तारक मंत्र नक्कीच सर्वांचे कल्याण करेल.