संपूर्ण विश्वातील पहिले अभियंता म्हणून भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते. विश्वकर्मा हे हिंदू देवता असून त्यांना देवतांचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाते.

महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात फेब्रुवारी महिन्यात भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते.

भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीला लोक कार्यालय, कारखाना, कार्यशाळा किंवा घरात पूजा करतात. कारागीर आपली अवजारे, यंत्रे, कलाकुसरीचे साहित्य इत्यादी यांची पूजा करतात.

हा सण प्रामुख्याने कारागीर, मजूर, अभियंता, वास्तुविशारद, यांत्रिकी आणि कारखान्यातील कामगारांसह विविध प्रकारच्या कारागिरीशी संबंधित लोकांद्वारे साजरा केला जातो.

असे म्हणतात की विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तु शस्त्रे यांची निर्मिती केली होती. याचप्रमाणे श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, रावणासाठी सोन्याची लंका इत्यादी विश्वकर्मा यांनी निर्माण केले होते.

महादेवांचे त्रिशूल, विष्णूंचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले, पुष्पक विमान, इंद्रदेवांचे वज्र, इत्यादी विश्वकर्मा यांनी निर्माण केले होते.

विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी गवंडी, लोहार, कुंभार, सुवर्णकार आणि शिल्पकार हा व्यवसाय करीत असलेले किंवा या जातीचे लोक भगवान विश्वकर्मा यांची नक्कीच पूजा करतात.

विश्वातील पहिले कुशल अभियंता आणि शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.