मुनमुन दत्ता ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी टेलिव्हिजन मध्ये काम करते. तारक मेहता का उल्टा चष्मा या हिंदी मालिका मध्ये बबिताच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
Image Source: Facebook
मुनमुन दत्ता यांचा जन्म 28 सप्टेंबर 1987 रोजी दुर्गापूर, पश्चिम बंगाल येथे झाला होता. इंग्रजी विषयामध्ये तिने पदव्युत्तर पदवी (MA) पूर्ण केली आहे.
Image Source: Facebook
कोलकत्ता येथे आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी बालगायिका म्हणून काम केले आहे. 2004 मध्ये झी टीव्हीच्या हम सब बाराती या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
Image Source: Facebook
कमल हसनच्या मुंबई एक्सप्रेस या चित्रपटात तिने पहिली भूमिका केली होती, त्यानंतर 2006 मध्ये हॉलिडे या चित्रपटात देखील ती दिसली होती.
Image Source: Facebook
2021 मध्ये तिच्यावर जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु त्यानंतर तिने माफी देखील मागितली होती.
Image Source: Facebook
सोनी सब टेलिव्हिजन चॅनलवर प्रदर्शित होणारी प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा यामध्ये बबीता अय्यर या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
Image Source: Facebook
याच मालिकेतील टिपेंद्र जेठालाल गडा (टप्पू) म्हणजेच राज अनाडकट याच्यासोबत गुपचूप एंगेजमेंट केल्याच्या बातमीने ती सध्या चर्चेत आहे.
Image Source: Facebook
सदर बातमी ही खोटी, हास्यस्पद आहे त्यात कुठलेही सत्य नाही असे मुनमुन दत्ता यांनी सांगितले आहे.
Image Source: Facebook