संपूर्ण जगभरात 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन किंवा मे दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिवस आहे. हा दिवस शिकागो येथे 4 मे 1986 मध्ये घडलेल्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
Image Source: Google
कुठल्याही देशाच्या विकासात तेथील कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कामगारांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
पूर्वी अमेरिकेत कामगारांचे प्रचंड प्रमाणात शोषण होत होते. कामगारांना दहा ते पंधरा तास राबवून घेतले जात असे. अमेरिकेच्या विविध कामगार संघटनांनी या विरोधात चळवळ उभी केली.
1 मे 1886 साली अमेरिकेतील लाखो कामगारांनी आपल्या कामाचे तास 8 तासांपेक्षा जास्त न करण्यासाठी आंदोलन केले. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कारखानदारांवर आणि सरकारवर दबाव आणला गेला.
कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळन लागले आणि त्यात अनेक कामगार आणि पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. कारखानदारांवर आणि सरकारवर दबाव वाढत गेला.
शेवटी 1 मे 1890 रोजी कामगार चळवळ यशस्वी झाली. 8 तास काम, पगारी रजा, चांगली वागणूक अशा अनेक कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतात 1923 साली पहिल्यांदा तामिळनाडू मध्ये लेबर किसान पक्षाकडून कामगार दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून भारतात सगळीकडे कामगार दिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.
भारतात कामगारांच्या हक्कासाठी जरी अनेक कायदे असले तरी अनेक कारखानदार कामगारांची विविध प्रकारे पिवळणूक करताना दिसून येतात. अशा कारखानदारांविरोधात वेळीच आवाज उठवायला हवा.