दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापन करण्यात आली होती आणि स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे. निरोगी व्यक्ती अधिक काळ आनंदी आयुष्य जगू शकते.

जागतिक आरोग्य दिनाव्यतिरिक्त, WHO जागतिक मलेरिया दिवस, क्षयरोग दिन, तंबाखू विरोधी दिन, एड्स दिन, अन्नसुरक्षा दिवस, इत्यादी अनेक आरोग्य कारणांसाठी मोहीम राबवते.

1991 पासून WHO ने एका विशिष्ट थीमनुसार जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचे ठरवले होते आणि तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या थीमनुसार दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

जगभरातील लाखो लोकांच्या आरोग्याचा अधिकार धोक्यात येत आहे. जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम ' माझे आरोग्य, माझा हक्क' आहे.

माझे आरोग्य माझा हक्क ही थीम सर्वत्र दर्जेदार आरोग्य सेवा, शिक्षण आणि माहिती तसेच सुरक्षित पिण्याचे पाणी, शुद्ध हवा, चांगले पोषण, सभ्य कामकाज अशा इतर हक्कांसाठी निवडण्यात आली आहे.